- Breaking News, नागपुर समाचार, मनोरंजन

नागपुर समाचार : सुनहरे गीत…..संगीतमय कार्यक्रम 26 जानेवारी रोजी

नागपूर समाचार : स्वरांकुर संगीत विद्यालय प्रस्तुत, “सुनहरे गीत “या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन येत्या गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सायंटिफीक सभागृह, आठरस्ता चौक लक्ष्मी नगर नागपूर येथे करण्यात आले आहे. यावेळी हिंदी चित्रपट गीतांची प्रस्तुती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत मार्गदर्शक गुणवंत घटवाई आहेत तर विलास अय्यर, विनय लाडकर, रवी ढोके, कार्तीक टवके, प्रीती चांदेकर,रुपाली देवस्थळे, सोनाली येलवटकर, अदिती धुमकेकर, गौरी नाईक, ईश्वरी पोटे, आर्या घटवाई, ऋत्वी तापस हे गीत सादर करतील.

परिमल जोशी, पंकज यादव, अक्षय हरले, मुग्धा तापस यावेळी साथसंगत करतील. आर्या घटवाई कार्यक्रमाचे निवेदन करतील. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी निःशुल्क आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *