- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : इतिहास संदर्भातील सामान्‍य ज्ञान वाढवणारे कॅलेंडर – सुधीर मुनगंटीवार

मैत्री परिवार संस्‍थेच्‍या दिनदर्शिका 2023 चे विमोचन 

नागपूर समाचार : मैत्री परिवार संस्थेची नववर्ष  2023 ची दिनदर्शिका अतिशय देखणी झाली असून देशभरातील महत्‍वाच्‍या आणि वैशिष्‍ट्यूपर्ण किल्‍ल्‍यांची सचित्र माहिती देणारी ही दिनदर्शिका सर्वांचे सामान्य ज्ञान वाढवणारी आहे, अशा शब्‍दात सांस्‍कृतिक कार्य व वन मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. 

नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडच्या सभागृहात मैत्री परिवार संस्थेच्या दिनदर्शिकेचे दिनदर्शिकेचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून भाजपा विदर्भ संगठन मंत्री मा. डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड व मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. संजय भेंडे, मैत्री परिवारचे सचिव प्रा. प्रमोदजी पेंडके, नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडचे उपाध्‍यक्ष अशोक गोयल यांची मंचावर उपस्थिती होती.

या कॅलेंडरची संकल्‍पना स्‍क्‍वेअर मिडीया सोल्‍यूशन्‍सच्‍या मंजुषा जोशी यांची असून डिझायनिंग व प्रिंटींगची जबाबदारी डिझाईन मार्टचे हेमंत नायडू यांनी सांभाळली. प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे यांनी तर सूत्रसंचालन महेश नंदनपवार यांनी केले. आभार आशुतोष पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला मैत्री परिवार संस्‍थेचे निरंजन वासेकर, अजय टेंभेकर, प्रकाश रथकंठीवार, प्रा. अनिल यावलकर, प्रा. माधुरी यावलकर, सीए समीर वझलवार, सीए स्वरुपा वझलवार, दत्ता शिर्के, रोहित हिमते, दिलीप ठाकरे, विजय जथे, श्रीकांत भोंगे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *