- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ग्रामायण प्रदर्शनीचा थाटात समारोप 

ग्रामायण प्रदर्शनीचा थाटात समारोप 

नागपुर समाचार : ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर महानगरपालिका व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रामनगर मैदानात पाच दिवस चालेल्‍या ग्रामायण सेवा प्रदर्शनाचा सोमवारी थाटात समारोप झाला. नागरिकांनी पाचही दिवस प्रदर्शनाला गर्दी केली व खरेदीचा आनंद लुटला.

समारोपीय कार्यक्रमाला आमदार व तर्पण फाउंडेशनेचे संचालक श्रीकांत भारतीय, अंकूर सिड्सचे सीइओ मनीष औरंगाबादकर, लाइफलाईन ब्‍लड बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. हरीष वरभे, प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर, स्‍कूल ऑफ स्‍कॉरर्सच्‍या आभा मेघे, समुपदेशक डॉ. स्‍वाती धर्माधिकारी, ग्रामायण प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अनिल सांबरे, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्‍यक्ष रवी वाघमारे यांची मंचावर उपस्‍थ‍िती होती.  

ग्रामायण प्रदर्शनामुळे तर्पण फाउंडेशनच्‍या कार्याला नवी झळाळी मिळाली असून या प्रदर्शनामुळे तर्पण 18 मुली मिळाल्‍या आहेत. या मुलींचे पालकत्‍व तर्पण फाउंडेशनने स्‍वीकारले असून त्‍यांच्‍या शिक्षणाचा खर्च करणार आमची तर्पण करणार आहे, असे मत व्‍यक्‍त केले. अठरा मुलींचा बाप झालो. 

विष्‍णू मनोहर यांनी भविष्‍यात ग्रामायण सोबत काम करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली व पुढचा विश्‍वविक्रम ग्रामायणच्‍या मंचावर करण्‍याचे आश्‍वासन दिले. 

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी समाजकार्य विद्यालयाच्‍या विद्यार्थींनींना प्रशस्‍तीपत्र वितरीत करण्‍यात आले. तसेच, कार्यकर्त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. लकी ड्राच्‍या विजेत्‍यांनादेखील यावेळी पुरस्‍कृत करण्‍यात आले. आर्टिस्टिकाच्या संचालिका नेहा मुंजे यांनी किरण कैलासवार व रंगभरी आर्ट झोनच्‍या रेणुका काटे यांचा सत्‍कार केला. प्रास्‍ताविक प्रशांत बुजोणे यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्र ग‍िरीधर यांनी केले. श्रावणी बुजोणे हिने ग्रामायण गीत सादर केले. 

दुपारच्‍या सत्रात कृषी व ग्रामीण उत्‍पादनांचे मार्केटिंग कसे यावर मार्केट मिरचीच्‍या संचालिका प्रगती गोखले यांच्‍यासह हेमंत चव्हाण आणि डॉ. प्रकाश गांधी यांनीदेखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन ग्रामायण प्रतिष्‍ठानचे सचिव संजय सराफ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *