- Breaking News, नागपुर समाचार, शीत सत्र २०२३

नागपूर समाचार : आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल – नितेश राणे

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल

नागपूर समाचार : जेव्हा पासून अभिनेते सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांचे मृत्यू झाले, तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरतांचे नावांची चर्चा का होत नाही हे समजण्याची गरज असल्याचे वक्त्व्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने 44 फोन का केले होते याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले. 

पुढे नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे खासदार राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचम कॅबिनेटमध्ये होते. जेव्हा ते पक्षाला पेट्या पाठवत होते. तेव्हा त्यांची किंमत होती. मात्र आता त्यांनी सत्याची बाजू घेतली असल्याने त्यांची किंमत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. सीबीआयकडे अद्याप वर्ग झाले नाही. या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे. आठ जून रोजी काय झाले, दोनवेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले. या प्रकरणाशी संबंधीत महत्वाचे सीसीटिव्ही फुटेज का गायब झाले. तसेच फ्लॅटच्या विजीटर्स बुकमधील पाने कोणी फाडली. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बाहेर का आला नाही. या प्रश्नांची उत्तरे समोर येणे गरजेचे असल्याचेही यावेळी नितेश राणे म्हणाले.

काय म्हणाले रोहीत पवार? : संसदेत कधीही न बोलणारे खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका (BMC) डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करुन असे खोटे आरोप होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करत आहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्यात आले. कर्नाटक निवडणुक येताच सीमावाद तापवण्यात येत आहे. तसाच प्रकार ‘एयू’ बाबत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *