- विदर्भ

हरियाणातून आलेल्या मजुरांना सलील देशमुखांनी पोहोचवले गावी

यवतमाळ समाचार : लाकडाऊनमुळे हरीयाणात अडकून पडलेले मजूर श्रमिक रेल्वेने नागपुरपर्यंत आले. पहाटे 5 वाजता रेल्वे स्थानकावर ते पोचले. पण तेथून गावी कसे यावे, त्यांना कळत नव्हते. अशा परीस्थितीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरजींव व जिल्हा परिषद सदस्य सलील त्यांच्या मदतीला आले आणि वैद्यकीय तपासणीसह जिल्ह्यातील घाटंजी व आर्णीपर्यंत पोहोचविण्याची पूर्ण व्यवस्था करुन दिली. कामानिमित्त घाटंजी तसेच आर्णी तालुक्यातील अनेक नागरिक फरिदाबाद (हरियाणा) येथे गेले होते. लॉकडाउनमध्ये राज्यातील कामगार, मजूर, व्यापारी व त्यांचे कुटुंबीय असे अनेक जण वेगवेगळ्या भागात अडकून पडले आहेत. त्यांना राज्यात पुन्हा येता यावे, यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आली आहे. घाटंजी तसेच आर्णी येथील हे मजूरांनी फरिदाबाद ते दिल्ली असा प्रवास केला. त्यानंतर रेल्वेने शनिवारी पहाटे साडेपाच वाजता नागपूर स्थानकावर पोहोचले. याठिकाणावरुन जिल्ह्यात येण्यासाठी त्यांना वैद्यकीय तपासणी गरजेची होती. जिल्हाबंदी असल्याने पासची गरज होती.

पहाटेच पोहोचल्याने त्यांना काय करावे सूचन नव्हते. त्यामुळे मजुरातील एकाने घाटंजी तालुक्यातील पोळीखुर्द येथील भावाशी संपर्क साधला. त्याने ही बाब राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मनिषा काटे यांच्या कानावर घातली. काटे यांनी लगेचच जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना माहिती दिली. सलील देशमुख यांनी मजुरांचा मोबाईल नंबर घेतला. ते कुठे आहेत, त्यांची विचारपूस केली. काही वेळातच मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची टिम तयार झाली. मजुरांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मजूरांना जाता यावे, यासाठी बस नसल्याने वाहन व्यवस्था करुन त्यासाठी पास काढून दिली. सर्व प्रक्रिया दुपारी पुर्ण झाली. त्यानंतर त्याच दिवशी मजुर नागपूरवरुन आपल्या गावी पोहोचले.

मजुरांना कोणतीही अडचण होवू नये, यासाठी काही कार्येकर्ते नागपूरात त्यांच्या सोबत होते. यात आर्णी तालुक्यातील तीन, घाटंजी तालुक्यातील 15 मजुरांचा समावेश होता. कोणतीही ओळख नसताना राज्याच्या गृहमंत्र्यांचा मुलगाच काळजीने विचारपुस करीत असल्याने मजुरांनाही त्यांचे नवल वाटले. विशेष म्हणजे, सायंकाळी सलील देशमुख यांनी घरी पोहोचले की नाही, यासाठी मजुरांशी संपर्क साधला. परतलेल्या मजुरांची जिल्ह्यात आल्यानंतर पुन्हा आरोग्य तपासणी केली असून ते सध्या आपापल्या गावात क्वारंटाईन झाले आहेत.

नागपूरात पोहोचल्यानंतर गावी येण्यासाठी बस नव्हती. जिल्हाबंदी असल्याने परवानगी आवश्यक होती. ओळखीचे कुणीच नसल्याने मी घरी भावाला माहिती दिली. काही वेळेनंतर काही जण आम्हाला शोधत आले. ते कोण होत आम्हाला माहिती नव्हते. त्यांनी आरोग्य तपासणी केली, गाडी, पास, चहा, नाश्त्याची व्यवस्था करुन दिली. नंतर आम्ही विचारले असता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलगा स्वतः मदत करीत असल्याने आश्चर्य वाटले. आम्ही अडचणीत असताना आम्हाला झालेली मदत कधीच विसरु शकणार नाही.

– योगीराज राठोड, मजूर, पोळीखुर्द, ता. घाटंजी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *