- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ना.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी संतप्त, तहसील पोलिस स्टेशनवर धडक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

ना.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी संतप्त, तहसील पोलिस स्टेशनवर धडक

नागपूर समाचार : भाजपचे ज्येष्ठ नेते उच्च, तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या. त्यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीने करण्यात आली.

नागपुरात महात्मा गांधी पुतळा इतवारी येथे तीव्र आंदोलन, नारे-निदर्शने करण्यात आले. गेल्या काही दिवसात भाजपनेते, युती सरकारचे मंत्री हेतूपुरस्पर महापुरुषांबद्दल अपमान जनक वक्तव्य करत आहेत ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील पोलीस गाठत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीची तक्रार नोंदविण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी आमदार प्रकाश गजभिये, सेवादल प्रदेशाध्यक्ष डाॅ जानबा मस्के, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष जावेद हबीब, अफजल फारूकी, रमन ठवकर, वर्षा शामकुळे, शिव भेंडे, सोमनाथ सींग,डाॅ प्रशांत बनकर, नूतनताई रेवतकर, लक्ष्मी सावरकर, सतीश इटकेलवार, महेंद्र भांगे, दिनकर वानखडे,अरविंद भाजीपाले, अशोक काटले,झाकीर शेख, धनंजय देशमुख, किरण शेख, बेलेकर, पुखराज श्रीपाद, राजेश पाटील, विनोद ढोके, अर्चना वाऊ, सुनीता येरने, सुफी टायगर आदी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *