- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार, सामाजिक 

नागपुर समाचार : सत्प्रवृत्ती वाढीला लागण्यासाठी दोषांचे निरसन आवश्यक – प. पू. संजय गोडबोले गुरुजी

श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचनमालेत प. पू. संजय गोडबोले गुरुजी यांनी पाचवे पुष्प गुंफले 

नागपुर समाचार : ‘जे खळांची व्यंकटी सांडो। यां सत्कर्मीं रती वाढो’ या पसायदानातील ओवी मध्ये ज्ञानेश्वर माउलींनी ज्या व्यक्ती खळ अर्थात वाईट प्रवृत्तीच्याआहेत त्यांच्यातील खलत्व अर्थात वाईट प्रवृत्ती नष्ट होवो आणि ते सत्प्रवृत्तीत परावर्तित होवे आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. असे करत असताना सर्व प्रथम आपल्या वृत्तीतील दोषांचे निरसन होणे आवश्यक आहे असे मत प. पू. संजय गोडबोले गुरुजी व्यक्त केले. *पसायदानातील ‘तया सत्कर्मी रती वाढो, भुता परपस्परे पडो मैत्र जिवांचे, दुरितांचे तीमिर जावो , विश्व स्वधर्म सूर्य पाहो ह्या ओवींवर देखील त्यांनी निरूपण केले.

प. पू. समर्थ सद्गुरू श्री. विष्णुदास स्वामी महाराज अध्याजत्मा -साधना केंद्र, नागपूरच्या वतीने 29 नोव्हेम्बर ते 8 डिसेंबर दरम्यान श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यासत आले आहे. या अंतर्गत संत सेवा संघ पुणेचे संस्थापक प्रवचनकार प. पू. संजय गोडबोले गुरुजी यांचे ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचनमाला आयोजिण्यात आली असून याच मालेचे पाचवे पुश गुंफताना गोडबोले गुरुजी बोलत होते.

याप्रसंगी प. पू. श्री. सद्गुरुदास महाराज यांची विशेष उपस्थिती होती. ब्रिगेडियर सुनील विनायक गावपांडे देखील आज उपस्थित होते. त्यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. पुढे गोखले यांनी सांगितले की पसायदान हे दर्शन समाजाचे ब्लुप्रिंट आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी नुसते समाज कसा असावा एवढेच सांगितले नाही तर तसा समाज कसा घडेल आणि त्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा सध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले असल्याचे सांगितले. चांगल्या आणि सुधृद समाजासाठी प्रथम दुष्प्रवृत्ती नष्ट होणे गरजेचे असल्याने माउलींनी ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे सुरवातीला म्हंटल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ‘भारत माता की जय’ चा जयघोष केला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात श्रीगुरुपूजेनंतर परमपूजनीय श्री. सद्गुरूदास महाराज यांच्या गुरूवाणीतून उपस्थित भाविक श्रोत्यांनी श्रीगुरुचरित्राचे श्रवण/पारायण केले.

आजचा कार्यक्रम – दुपारी 3.30 ते 5 वाजेदरम्यापन संत सेवा संघ पुणेचे संस्थापक प्रवचनकार प. पू. संजय गोडबोले गुरुजी यांचे ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचनाचे सहावे पुष्प. याशिवाय श्री गुरुमंदिर, 80, आरबीआय कॉलनी, जयप्रकाश नगर खामला येथे या अंतर्गत या सोहळ्यात कीर्तन, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *