- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेच्या माध्यम समन्वयासंदर्भात बैठक

इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेच्या माध्यम समन्वयासंदर्भात बैठक

नागपुर समाचार : भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यम समन्वयासंदर्भात आढावा बैठक नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी.एस. खाडेकर, राजेश सिंग, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, नागपूर विद्यापीठाच्या माध्यम विभागाचे प्रमुख मोईज मन्नान हक हे यावेळी उपस्थित होते.

1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकत्ता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हे आयोजन भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे घेतले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *