- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

गोंदिया समाचार : ग्राम बटांना येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न

ग्राम बटांना येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न

गोंदिया समाचार : आज ग्राम बटांना, तालुका गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता श्री फोगलजी साठवणे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी ग्रामपंचायत निवडणूक, पक्ष संघटन व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या दूरदृष्टीकोनातून होत असलेल्या अनेक विकास कामांना व विचारसरणीला समोर ठेवून, आपल्या गावाच्या विकासासाठी सकारात्मक दुष्टीकोनातून ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काम केल्यास सरपंच व सदस्य निवडून येणे कठीण नाही. गावातील पक्ष किंवा समविचारी लोकांशी असलेले हेवेदावे विसरून आपापसातील दुरावा नष्ट करा तरच संघटन मजबूत होईल. आपसात समन्वय साधून निवडणुकीचे योग्य नियोजन करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा ग्रामपंचायतींवर फडकेल यासाठी परिश्रम घ्या. असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, फोगलजी साठवणे, सुनील पटले, प्रितपाल येडे, देवेंद्र चौधरी, प्रकाश साठवणे, प्रवीण पटले, मंगेश साठवणे, कुलनेश्वेर लांजेवार, पप्पू रामटेके, दीपक साठवणे, देवचंद लांजेवार, मुन्ना बावनकर, रवींद्र चौधरी, लतिराम येडे, बंडू गजभिये सहित कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *