- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, शिक्षा

चंद्रपूर समाचार : ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होतोय!

चंद्रपूर समाचार : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह जी जिल्ह्यातील ३६५ दिवस चालणारी शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्ण शाळा, विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर अशी शाळा म्हणून नावलौकिकास असलेली शाळा म्हणजे पालडोह आज या शाळेतील मुलांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत ३१ जुलै २०२२ ला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी च्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे, या निकालनुसार पालडोह शाळेच्या वर्ग ५ वीच्या परीक्षेला बसलेल्या ११ विद्यार्थ्या पैकी १० विद्यार्थ्यांनी या देदीप्यमान यशाला गवसणी घालून शाळेच्या प्रगतीत आणखी एक यशाचा तुरा रोवला आहे. पालडोह येथील १० विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र झाले आहेत. यामध्ये काव्या राठोड, आदित्य कानंकंदडे, बजरंग सुरनर, प्रवलीक नांदूरे, प्रतिक्षा आईतवाड, प्रवीण सुरनर, माधुरी रुंजे, शेषेराव कुंडगिर, पायल चव्हाण, दुर्गा गोटमवाड यांचा समावेश आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत, आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शन यामुळे हे यश त्यांनी संपादन केले आहे, या अगोदर ही प्रत्येक वर्षी या शाळेचे अनेक विध्यार्थी शिष्यवृत्ती पात्रता यादीत आणि शासन घेत असलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकले आहेत ही एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे. अनेक प्रकारच्या विविध परीक्षेत लक्षवेधी निकाल देणारी शाळा म्हणून परिसरात या शाळेची ओळख आहे. तसेच ही शाळा ३६५ दिवस चालणारी एकमेव जिल्ह्यातील व तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह शाळेने आपली छाप सोडली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक पानघाटे, विषय शिक्षक कुचनकर, शिक्षण प्रेमी देवकते व रुंजे मॅडम, कोमल हाके शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, संगीता हाके शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, जनकीराम कनंकदडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अर्चना धुलगुंडे, अर्चना बाजगीर, चंद्रकला वारलवाड, शुभांगी राऊत, अमोल पवार, रमेश चव्हाण, गोपीनाथ देवकते, नारायण बाजगीर, व संपूर्ण गावकरी मंडळी व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *