- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : विशेष अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन

विशेष अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन

नागपूर समाचार : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर द्वारा संचालित कृषि विज्ञान केंद्र दुधबर्डी द्वारा भारत सरकारच्या वतीने स्वच्छता अभियान अंतर्गत विशेष अभियान 2.0 संपूर्ण देशात राबविले जात असून त्यात घन कचरा व्यवस्थापन यावर चर्चासत्र कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र दुधबर्डीचे वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख डॉ. सारिपुत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथे कोमल ठाकरे यांच्या गांडूळखत प्रकल्प प्रक्षेत्रावर चर्चासत्र घेण्यात आला. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र दुधबर्डी चे विषय विशेषज्ञ कमलेश चांदेवार यांनी गांडूळ खताचे महत्त्व अनन्यसाधारण असून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि उत्तम पिके घेण्यासाठी गांडूळ खताचा वापर करावा, असे प्रतिपादन केले. कापूस आणि तत्सम पिकांकरिता कोणती विशेष काळजी घ्यावी, या बद्दल माहिती दिली. तसेच घनकचरा गोळा करून नष्ट न करता त्याचे कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत तयार करावे, असे त्यांनी सांगितले.
त्याच बरोबर कृषि विज्ञान केंद्र दुधबर्डी चे कर्मचारी आणि ग्रामपंचायत हत्तीसरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ्ता मोहीम २.० हत्तीसरा ग्राम पंचायतीच्या आवारात राबविण्यात आली.

याप्रसंगी हत्तीसरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल गुडधे, कृषि विज्ञान केंद्र दुधबर्डीचे विषय विशेषज्ञ कमलेश चांदेवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्मिता सावरकर, प्रक्षेत्र व्यवस्थापक भूषण भक्ते हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला 25 शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुशल सहायक राकेश खोब्रागडे, पवन तातोडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *