महान साहित्यसंघटक निवर्तला, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्य संघाची खूप मोठी क्षती
नागपूर समाचार : उत्तम संघटक, व्यवस्थापक, खेळाडू, साहित्याचे जाणकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.
गेल्या 16 वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून 50 वर्षांपासून ते विदर्भ साहित्य संघाचे सदस्य होते. त्यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे ‘मॅनेजमेंट गुरु’ हरविल्याची भावना पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी व्यक्त केली.

पंडितजी म्हणाले की म्हैसाळकर यांच्याशी अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध होते.मागील वर्षी 14 जानेवारीला त्यांनी मला आवर्जून फोन केला होता व म्हणाले होते की 14 जानेवारीला तुमचा वाढदिवस आहे त्यामुळे तुम्ही तुच्याकडील कार्यक्रम सकाळी आटोपून घ्या व सायंकाळी विदर्भ साहीत्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमास उपस्थित रहावे. त्यांच्या विनंती ला मान देऊन मी तेथे गेलो असता त्यांना खूप आनंद झाला.

तेव्हा ते म्हणाले की तुमचे हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व आहे पण तुम्ही आज मराठीतच भाषण करा. त्यावेळेस मी जवळपास 40 मिनिटे अस्खलित मराठीत बोललो तेव्हा ते अत्यंत भारावून गेले व त्यांनी माझी पाठ थोपटली. आज हा साहीत्य संघाचा महानायक आपल्याला सोडून गेल्याने अतीव दुःख झाले व साहित्य संघाची खूप मोठी क्षती झाली अशी भावना पंडितजींनी व्यक्त केली.



