- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासमोर युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

रुग्णालय स्थानांतरण करण्याच्या विरोधात नारे-निदर्शने

नागपूर समाचार : कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र मिहान येथे स्थानांतरित करण्यात येत आहे. या विरोधात आज शनिवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. कुणालदादा राऊत यांच्या मार्गदर्शनात व उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष निलेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

माजी ऊर्जा मंत्री व नागपूरचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अथक प्रयत्नाने गोरगरिबांच्या आरोग्याच्या सोयीच्या दृष्टीने कामठी रोड येथे उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल व अनुसंधान केंद्र मिहान येथे स्थानांतरित करण्याचे षडयंत्र विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे. या रुग्णालयामुळे उत्तर नागपूरच्या गोरगरीब जनतेसह जबलपूर, मध्य प्रदेश, शिवनी, छत्तीसगड येथील लोकांना वेळेवर उपचार मिळने सोयीचे होत आहे. मात्र भाजप सरकार गोरगरीब जनतेच्या विरोधात दिसत आहे. त्यामुळेच सदर हॉस्पिटल मीहान येथे स्थानांतरित करण्याचा घाट घातल्या जात आहे.

मिहान शहरापासून 20 ते 22 किलोमीटर लांब असल्याने अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार नाहीत. गोरगरीब जनतेच्या सोयीचे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र मिहान येथे स्थलांतरित करू नये अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला. सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार नारे निदर्शनेही करण्यात आली.

याप्रसंगी सुरेश पाटिल, गौतम अ‌ंबादे, निलेश खोब्रागडे, कल्पना द्रौनकर, महेद्र बोरकर, उतरेस वासनिक, प्रकाश नांदगावे, चेतन तरारे, सचिन वासनिक, प्रफुल किरपाने, संपऋषी लाजेवार, कुणाल निमगडे, राकेश निकोसे, विलियम साखरे, निशाद ईदुरकर, आकाश इंदुरकर, शाहनवाज शेख, अकुश चौधरी, अश्विन कुंभलकर, नंदू रोकडे, शादिक अली, अश्विन कोटांगले, रविद्र जंनबधु, विजय डोगरे, आतिष रामटेके, जयमाला साखरे, बेबी गौरीकर, दीपा गावंडे, शालिनी रामटेके, शारदा रामटेके, अशमिता पाटील, शायदा खान, साविती राऊत, प्रतिभा कोटागले, रेखा रंगारी, रंजना मेश्राम यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *