- Breaking News, नागपुर समाचार

वर्धा समाचार : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता खासदार सुधांशूजी त्रिवेदी यांची अग्निहोत्री महाविद्यालयास सदिच्छा भेट

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता खासदार सुधांशूजी त्रिवेदी यांची अग्निहोत्री महाविद्यालयास सदिच्छा भेट

वर्धा समाचार : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता खासदार सुधांशूजी त्रिवेदी यांची अग्निहोत्री महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री तसेच सचिव श्री सचिनजी अग्निहोत्री यांनी त्यांचे स्वागत केले.

अग्निहोत्री यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा करताना पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी संस्थे अंतर्गत चालणाऱ्या विविध कोर्सेस असलेल्या शाळा महाविद्यालया विषयी माहिती देताना सांगितले की गोर गरीब विद्यार्थ्यांना माफक दरात शुल्क आकारून तर अत्यंत हलाखीच्या परिस्थिती शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण दिल्या जाते.

जम्मू काश्मीर मधील जवळपास 7000 विद्यार्थ्यांनी संस्थेतुन शिक्षण घेतले असून आज ते उच्चस्थ पदावर कार्यरत आहेत.याबाबत पंडितजींचा जम्मू काश्मीर प्रशासनाने कारगिल गौरव पुरस्काराने गौरविले.सीमावर्ती भागातील प्रभावित गाव वंडरमण येथी 10 मुलां मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी पंडीतजींनी स्वीकारली आहे. हे सर्व ऐकून सुधांशूजी त्रिवेदी अत्याधिक प्रभावित व आनंदी झाले व पंडितजींच्या या सतकार्यांची प्रशंसा केली.

वर्धा जिल्हा हा गांधी विनोबांचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो, तसेच स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदीजींनी गुजरात मधील कवाडीया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन दर्शन दर्शविण्यासाठी लाईट साउंड फौंटेन ची निर्मिती केली.

तसेच जालियनवाला बागेत शुरवीरांची शौर्य गाथा दर्शविणारी लाईट साउंड फौंटेन तसेच मा.नितीनजी गडकरींनी नागपुर मध्ये फुटाळा तलावात लाईट साउंड फौंटेन ची निर्मिती केली त्याच धर्तीवर गांधी विनोबांचे जीवन दर्शन दर्शविणारी लाईट साउंड फौंटेन ची निर्मिती करावी ज्या करिता 200 ते 250 कोटी रुपये खर्च येईल व 10 एकर जागा लागेल जी सहज उपलब्ध होईल.

तसेच वर्धा जिल्ह्यातील दक्षिणेची काशी म्हणून ओळख असलेले माता महाकाली धामतीर्थ येथे भक्तांना सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी तसेच विकास कार्य करण्याकरिता 15 कोटींचा निधी आवश्यक आहे.तसेच मंदिरा लागतची 73 हेक्टर जमीन जी पाटबंधारे विभागाची आहे त्यापैकी 1 एकर जमीन जय महाकाली सेवा मंडळास भाडेपट्ट्याने देण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी भक्तांना विविध सोयी सुविधा निर्माण करून विकास कामे करता येतील. या दोन्ही मागण्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पर्यंत पोहचून विशेष प्रयत्न करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी खासदार सुधांशूजी त्रिवेदी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *