- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सुवर्णा रंगारी डहाट समाजभूषण पुरस्कार प्रदान

नागपूर समाचार : छत्रपती संभाजीनगर द्वारा दिला जाणारा साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार’ नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई रंगारी (डहाट) यांना नुकताच 5 मे 2024 रोजी प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणीक कार्याचा व प्रबोधनाचा आदर्श लक्षात घेऊन त्यांना साहित्य धारा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक डॉ. संघर्ष सावळे, जयश्री सोनकवडे जाधव (प्रादेशिक उपायुक्त) प्रा.डॉ.संजय मोहोळ (संगीत विभाग प्रमुख कला व वाणिज्य), पूज्य भंतेजी डॉ.चंद्रबोधी, हिवाळे साहेब, डॉ.विजयकुमार कस्तुरे, डी.जे‌.शेगोकार (अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण तथा माजी जिल्हा न्यायाधीश यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

सुवर्णा रंगारी (डहाट) यांच्या द्वारा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अंधश्रद्धा निर्मूलन तसेच स्त्रीयांच्या मासिक पाळीतील आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्य अविरतपणे सुरू असून त्यांच्या या कार्याची दखल घेत समाजभूषण पूरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आई, वडील त्यांचे गुरूवर्य उत्तम देशभ्रतार, वासनिक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. रेसिका जाधव, डॉ.रूपा वर्मा यांना दिले असून त्यांना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करणारे नागेश वाहूरवाघ पि.ए.फॉउंडेशनचे अजय कुमार, सुरेंद्र मेश्राम, अंकीत राऊत, अनिता मसराम, रंजीता श्रीवास्तव, यांचे आभार मानले, तसेच अल्का सोमकूवर, सोयम लांजेवार, प्रिती गेडाम, आशिष नागदेवते, सीमा वानखेडे, बबिता डोळस,ज्वाला, जोत्स्ना, किरण इंगळे, मनोरमा सोमकुवर, भावना मॅडम आणी सर्व मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *