- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : एचसीएल टेक्नॉलॉजीच्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो फीडर सेवांचा शुभारंभ

मेट्रो प्रवासासह कर्मचारी घेणार आता फीडर सेवांचा लाभ 

नागपूर समाचार : जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा तसेच शेवटच्या घटका पर्यंत मेट्रो सेवा पोहोचावी असा महा मेट्रोचा मानस असून फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंतर्गत महा मेट्रोने नेहमीच अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज मिहान येथील एचसीएल टेकनॉलॉजी येथे कार्यरत कर्मचाऱया करता महा मेट्रो आणि मनपाच्या संयुक्त विद्यमानाने फिडर सर्व्हिसचा शुभारंभ करण्यात आला.

शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी एचसीएल टेकनॉलॉजीच्या परिसरात फिडर सर्व्हिसचा शुभारंभ करण्यात आला. या फिडर सर्व्हिस एचसीएल टेकनॉलॉजीच्या परिसरात उपलब्ध असतील जेणेकरून मेट्रो प्रवाश्याना खापरी मेट्रो स्टेशन ते एचसीएल टेकनॉलॉजी पर्यंत सहज पणे पोहोचता येईल. या फिडर सर्व्हिस मध्ये ई -सायकल, ई- बाईक, ई-रिक्षा तसेच नागपूर महानगर पालिकेच्या स्टार बस उपलब्ध असतील. या पूर्वी देखील महा मेट्रो द्वारे मिहान परिसरात फिडर सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आल्या असून एचसीएल टेकनॉलॉजीच्या वतीने महा मेट्रोला त्याच्या परिसरात फिडर सर्व्हिस करिता विनंती केली होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मोठ्या प्रमाणात सर्व गोष्टी नियमित होत असून कोविडच्या काळात वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी आता पूर्वी प्रमाणे ऑफिस मध्ये येऊ लागले असून दिवसे-दिवस या कर्मचाऱ्या मध्ये वाढ होत असल्याचे एचसीएल टेकनॉलॉजीचे वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले, तसेच त्यांनी या कार्यक्रम दरम्यान नमूद केले कि, खापरी मेट्रो स्टेशन आमच्या ऑफिस पासून जवळ असल्याच्या कारणास्तव आमच्या कर्मचाऱ्याना मेट्रोचा वापर करण्याकरिता प्रोत्साहित करत असून आमचा स्टाफ देखील नियमित पणे मेट्रोचा उपयोग करित आहे. एचसीएल टेकनॉलॉजी मध्ये तसेच मिहान येथे मोठ्या प्रमाणात शहरातून दररोज येतात.

या कार्यक्रमा प्रसंगी महा मेट्रोचे कार्यकारी संचालक उदय बोरवणकर, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, संयुक्त महाव्यवस्थापक महेश गुप्ता तसेच एचसीएल टेकनॉलॉजीचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असा महा मेट्रोचा मानस असून कडक उन्हाळा बघता मेट्रोच्या प्रवाश्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, नागरिक देखील मेट्रोच्या प्रवासाला पसंती देत आहे तसेच शालेय व कॉलेज जाणारे विद्यार्थी नियमित पणे मेट्रोचा उपयोग करत असल्याचे दिसते. महा मेट्रो शहरातील इतर फिडर सेवा ऑपरेटर्स ना आवाहन करते कि, जे पर्यावरण पूरक फिडर सेवा प्रदान करतात त्यांनी मेट्रोशी संलग्न होऊन नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *