- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार, विदर्भ

काटोल समाचार : खासदार चषक स्पर्धेतील खेळाडूंना गणवेश किटचे वितरण

खासदार चषक स्पर्धेतील खेळाडूंना गणवेश किटचे वितरण

काटोल समाचार : येथील साई स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडूंना कनक जिनिंग व प्रेसिंगच्या वतीने गणवेश किट वितरित करण्यात आली. नागपूर येथे खासदार चषक २०२२ क्रीडा महोत्सवात कबड्डी‌ सामन्याचे आयोजन केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे पुढाकाराने सुरू आहे. सदर स्पर्धेत काटोल येथील कबड्डी संघ साई स्पोर्टिंग क्लब अंतर्गत सराव करून स्पर्धेत सहभागी होत आहे. या सर्व‌ काटोलच्या मुलामुलींच्या संघास कनक जिनिंग ॲण्ड प्रेसिंगचे संचालक अंशू ठाकूर यांच्या हस्ते टीशर्ट व किट भेट देण्यात आली. 

याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष शत्रूघ्न राऊत, मार्गदर्शक सचिन वाळके, प्रशिक्षक विलास धवड, वैभव विरखरे आदी उपस्थित होते. दरम्यान काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर, माजी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, तानाजी थोटे, किशोर गाढवे, राजू चरडे, आदींनी संघास पुढील यशाकरीता शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.