- नागपुर समाचार, मनपा

मनपाचे डॉ.मनगटे यांच्या सत्कार

नागपूर, ता. 18 : कोविड साथरोगाच्या काळात कोविड रूग्णांना  उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील 200 दंतरोग तज्ञांचा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य दंत परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. त्यावेळी दंत तज्ञांच्या विविध प्रश्नांवर ही चर्चा झाली. हे सर्व प्रश्न सोडवण्याचे दोन्ही मंत्री महोदयांनी आश्वासन दिले. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे डॉ.शुभम मनगटे यांच्यासुध्दा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

           त्यावेळी व्यासपीठावर इंडियन डेंटल असोसिएशन चे राष्ट्रीय सचिव डॉ. आशोक ढोबळे, भारतीय दंत परिषदेचे सदस्य डॉ. राहुल हेगडे व डॉ. अरूण दोडमनी, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेश गायकवाड, डॉ. राजेंद्र कुमार भस्मे, डॉ. राजेंद्र बिरंगणे, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. समीर पाटील, प्रबंधक शिल्पा परब यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.