- Breaking News

नागपूर समाचार : इतवारी रेल्वे स्टेशन ला ‘महानत्यागी बाबा जुमदेवजी’ रेल्वे स्टेशन इतवारी नागपुर हे नामकरण करण्याबाबत गडकरींना निवेदन देण्यात आले

इतवारी रेल्वे स्टेशन नागपुर ला ‘महानत्यागी बाबा जुमदेवजी’ रेल्वे स्टेशन इतवारी नागपुर हे नामकरण करण्याबाबत निवेदन

नागपूर समाचार (वासुदेव पोटभरे) : आपल्या सेवेशी निवेदन सादर करीत आहे की महानत्यागी बाबा जुमदेवजी ठुब्रीकर यांचा जन्म गोलीबार चौक नागपुर इथे दि. ०३/०४/१९२१ ला खुब गरीब परिवारात झाला. बाबा जुमदेवजी यांचे शिक्षण ४ था वर्गापर्यंत झाले. त्यांच्या परिवारात खुब दुःख होते म्हणून त्यांनी एका भगवंताची (बाबा हनुमानजी) यांची प्राप्ति करून आपल्या परिवाराला सुखी केले त्या नंतर त्यांनी मानव धर्माची स्थापना केली. व या कृपेचा लाभ निष्काम आणि निस्वार्थ भावनेने खुब त्याग करुन मानव धर्माचा प्रसार प्रचार केला. बाबानी या मार्गात अनेक जाती धर्माच भेदभाव नष्ट करून अनेक दुखी, कष्टी, अंधश्रद्देत व अनेक वाइट व्यसन (उदा. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची होड, कोंबड्याची काती) या पासून पीड़ित व्यक्तीला मार्गदर्शन करुन त्याला व त्याचा परिवाराला सुखी संपन्न जीवन जगण्याचा मार्ग दाखविला.

बाबा जुमदेवजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपुर या संस्थेची स्थापना केली. या मार्गांचे सेवक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण भारतात व विदेशात ही आहे.

बाबा जुमदेवजी यानी इतवारी रेल्वे स्टेशन नागपुर वरुन सेवकांच्या सोबत भंडारा गोंदिया या जिल्ह्यात गावो गावी फिरून तसेच शांतिनगर, मस्कासाथ व आजु बाजूच्या परिसरात संत्संग चर्चा बैठकीच्या माध्यमातून मानव जागृताचे कार्य केले म्हणून आम्हा सेवकांना या रेल्वे स्टेशन चे ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच रेल्वे स्टेशनवरून भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपुर जिल्हा व मध्यप्रदेश, छत्तीसगढ़ राज्यातील सेवक याच रेलवे स्टेशन वर येतात इथून बाबा जुमदेवजी यांच्या घरी (निवास स्थान) गोलीबार चौक टिमकी नागपुर इथे जातात या इतवारी रेल्वे स्टेशन वरुण महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे निवासस्थान अंदाजे १ किलो मीटर च्या अंतरावर आहे. म्हणून आम्हा सेवकांची आपणास नम्र विनंती आहे. की महानत्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्टेशनइतवारी नागपुर हे नाव देण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.