- नागपुर समाचार, स्वास्थ 

डॉ स्व.अमोल वानखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वैद्यकीय शिबिराचे आयोजन

NBP NEWS 24,

31-03-2022.


नागपूर: जेव्हा कोरोना संकट काळात संपूर्ण जग बंद होत. त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा नकरता डॉ अमोल वानखेडे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लढत होते.पण नियतीने घाला असा टाकला की डॉ वानखेडे यांना हृदयविकार चा झटका आला, व त्यांची प्राणज्योत मावळली. कोरोना काळात

अनेकांना मदत करणारे डॉ वानखेडे क्षणात हे जग सोडून निघून गेले. स्व. डॉ. अमोल मोरेश्वर वानखेडे अस्थी रोग तज्ञ होते.यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या मातोश्री कलावती ताई वानखेडे यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात संपूर्ण शरीराच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. या वैद्यकीय शिबिराचा पाचशेहून अधिक लोकांनी लाभ घेतला. दक्षिण नागपूर चे नेते मा. गिरीश भाऊ पांडव यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित प्रभागाचे नगरसेवक संजय महाकाळकर,रजनी ताई बरडे वीणा बेलगे, सुहास नानवटकर,प्रवीण विघरे, नानाभाऊ झोडे,जयश्री थोरात,पूजा देशमुख , सौरभ कालमेघ, अमोल धरमारे,राहुल अभंग,बबन गंजरे प्रा. वानखेडे ,जुंघरे ,कडू सर इत्यादी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *