- नागपुर समाचार

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन, उद्योगांचा विकास युवकांनी करावा: श्री देवेंद्र फडणवीस

NBP NEWS 24,

27 March, 2022

युथ एम्पावरमेंट समिटचा समारोप

नागपूर, २७ मार्च: रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात, नवनवीन तंत्रज्ञानामुळे असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्टार्ट अप इंडीया, स्टॅण्ड अप इंडिया यासारख्या योजनांमधून युवकांना संधीची नवनवी दालने खुली होत आहेत. नोकरी मोठ्या पदाचीच किवा सरकारीच मिळावी, हा रूढ समज मोडीत काढून, युवकांना आपल्या रोजगाराच्या संकल्पना बदलाव्या लागतील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. युथ एम्पावरमेंट समिट २०२२ च्या समारोपीय सत्रात त्यांनी उपस्थित विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.

YOUTH EMPOWERMENT SUMMIT PHOTO

आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात, फडणवीस यांनी या व्यापक आणि सातत्यपूर्ण आयोजनासाठी प्रा.अनिल सोले यांचे विशेष अभिनंदन केले. नवीन शिक्षण धोरणाचा उल्लेख करून ते म्हणाले की, या धोरणामुळे शिक्षण पद्धतीत बदल होतील आणि रोजगाराचे क्षेत्र जास्त व्यापक होईल. तसेच, स्वयंरोजगारालाही चालना मिळेल. मात्र, बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन, उद्योगांचा विकास करण्याचे आणि धैर्याने पुढे जाण्याची मानसिक तयारी युवकांनी करावी, असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी, विविध आस्थापनांकडून नियुक्तीपत्र प्राप्त करणा-या उमेदवारांना त्यांचे नियुक्तीपत्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यानंतर विविध कंपन्या प्रतिष्ठान यात मुलाखती सुरू होत्या. समिटमध्ये समारोपाच्या दिवशी ३०० पेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

समारोपीय सत्रात मंचावर भाजपनेते संदीप जाधव, सुधाकर देशमुख, प्रवीण दटके, चेतन कायरकर, जयप्रकाश गुप्ता, राजेश रोकडे, आशिष वांदिले आणि इतर पदाधिकारी हे उपस्थित होते. तर, विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे आणि मोहन मते यांनी समिटमधील प्रदर्शनाला भेट दिली आणि या उपक्रमाचे कौतुक केले. तत्पूर्वी, फॉच्र्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कुणाल पडोळे यांनी केले.

कुछ पानेके लिये…कुछ करना पडता है!
कोरोनाकाळात ऑक्सिजन मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले प्यारेखान यांनी युथ एम्पावरमेंट समिटमधील युवकांना मार्गदर्शन केले. आपल्या संबोधनात ते म्हणाले की, माझ्या यशस्वी शिखरावरील मार्गक्रमणात अपयशाचे विविध प्रसंग ‘हार नहीं मानूंगा‘ हेच ध्येय समोर ठेवून अपयशाची चिंता न करता पुढे वाटचाल सुरू ठेवली. हेच माझ्या यशाचे खरे श्रेय‘ असे प्रतिपादन त्यांनी युवकांसमोर केले. कुछ पानेके लिये, कुछ खोना नहीं पडता लेकीन, कुछ करना पडता है! या एका वाक्यात त्यांनी युवकांना जीवनसूत्र सांगितले. यशाकडे जाणा-या खडतर मार्गात आलेल्या अडचणीतून निराश न होता, यशोशिखर गाठण्याचे ध्येय समोर ठेवून, अविरत वाटचाल सुरू ठेवली तर यश आपल्यामागे धावत येईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *