नागपूर समाचार : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण पूर्व उपक्रमाच्या तयारीबाबत लेखी निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने नागपूर जिल्हयातील 12 विधानसभा मतदार संघाअंतर्गत नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व केंद्रस्तरीय पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून मतदार यादीतील मतदारांशी मतदार मॅपींग करण्याचे काम प्रत्येक विधानसभा स्तरावर सुरू करण्यात आलेले आहे.
प्रत्येक मतदाराने त्यांच्या मतदान केंद्रावरील नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क करुन सन 2002 च्या यादीतील मतदाराचे स्वतःचे नाव असलेला पुरावा किंवा कुटुंबातील आई, वडील, आजी आजोबा यांचे नाव तसेच सुनांनी त्यांच्या आई वडीलांची सन 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असल्याबाबत पुरावा देवून मॅपींग करण्यात यावे.
ही मॅपिंग प्रक्रिया अत्यंत महत्वाची व अनिवार्य आहे. मॅपिंग नसल्यास आपले नाव मतदार यादीतून वगळल्या जावू शकते याची नोंद घ्यावी.
त्यामुळे मतदाराने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट किंवा फोनव्दारे संपर्क साधावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून नागरिकांनी आपली माहिती पडताळणी करुन मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.




