हिंगणघाट समाचार : विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
आज दि.११ एप्रिल रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित आमदार समीर कुणावार यांनी म. फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत उपस्थितांना संबोधित केले.

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे एकमेव असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी महात्मा फुले यांचे जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांचे वतीने ज्योतिबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ता राजू गंधारे, पत्रकार विलास नवघरे, राहुल गाढवे, समाजसेवक अनिल भोंगाडे, रवी काटवले इत्यादीसह असंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.




