- Breaking News, विदर्भ

अकोला समाचार : ‘विजय संकल्प सभे’तून अकोल्यासाठी विकासाचा निर्धार

अकोला समाचार : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज अकोला येथे आयोजित ‘विजय संकल्प सभे’त जनतेशी संवाद साधला.

सभेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता 60 पेक्षा जास्त जागांचे टार्गेट महायुती निश्चितपणे पार करेल, याची खात्री पटली. विकासासाठी कटिबद्ध महायुतीच्या माध्यमातून, अकोल्यात आपण वाढीव पाणीपुरवठा योजना, जलवितरणाचे जाळे, सौरऊर्जा प्रकल्प अशी अनेक कामे पूर्ण केली. अकोला शहराच्या हद्दवाढीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि भूमिगत गटारे, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरणासाठी कोट्यवधींचा निधी दिला जाईल याचे आश्वासन दिले.

अकोला विमानतळाचे विस्तारीकरण आपण करणार आहोत, याकरिता भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करत आहोत. स्कायनेक्स एअरोस्पेस यांच्या सोबतच्या करारातून अकोल्यात एअर ट्रेनिंग सेंटर देखील सुरू करणार आहोत. याव्यतिरिक्त, अकोल्यात रेल्वे स्थानक विकसित करत आहोत, ज्याला कार्गो टर्मिनल म्हणून मान्यताही मिळाली आहे आणि यामुळे रोजगार संधी उपलब्ध होतील. 

अकोल्याची ओळख असलेल्या राज राजेश्वर मंदिर संस्थानाच्या ₹50 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. सांस्कृतिक भवन, जलतरण तलाव, सरोवरांचे पुनरुज्जीवन, मध्यवर्ती वाणिज्य संकुल अशा अनेक विकासकामांना निधी उपलब्ध करून प्रगतीपथावर आणले आहे. तसेच अकोला महानगरपालिकेची नवीन इमारत देखील आपण उभारणार आहोत. पुढील 5 वर्षांत सर्व डीपी रोड सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देऊ. 

आमचे विकासाचे व्हिजन आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी अकोला महानगरपालिकेची सत्ता महायुतीच्या हाती द्या. 15 तारखेला तुम्ही महायुतीची काळजी घ्या, आम्ही अकोला शहराला आधुनिक शहर बनवू. 

यावेळी मंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.