नागपूर समाचार : केंद्र व राज्य शासनाच्या ‘हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी (ता.१३) झिरो माईल फ्रीडम पार्क येथे तिरंगा कॅनव्हास उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी १५० हून अधिक चित्रकारांनी तिरंगा कॅनव्हास साकारले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या देखरेखीत क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय चित्रकला महाविद्यालय, शरद पवार चित्रकला महाविद्यालय, श्री चित्रकला महाविद्यालय, नागपूर स्कूल ऑफ आर्ट मधील १५० कलावंत विद्यार्थी यांनी तिरंगा कॅनव्हास तयार केले.