नागपूर समाचार : भाजप कन्हान मंडळातर्फे बनपुरी ग्रा.पं. सभा मंडपात मोदी सरकारचे ११ वर्ष संकल्प से सिद्धी तक सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे या अभियानांतर्गत १८ जून रोजी कन्हान मंडळ अध्यक्ष बीरेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संबोधन प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक देवेंद्र सिंह सेंगर यांनी मोदींचे अकरा वर्षाच्या केलेले महत्त्वपूर्ण कार्याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य व्यंकटेश कारामोरे होते. यावेळी माजी सरपंच नंदलाल बावनकुळे, माजी पं.स. सदस्य नरेश मेश्राम, बनपुरी ग्रा.पं. सरपंच शालिनी नंदलाल बावनकुळे, कैलास खंडार, केरडी सरपंच पिंटू खंडार, रुपेश ढोबळे, विनोद कोहळे युवा मोर्चा अध्यक्ष, विशाल चाफले, सतीश वाडीभस्मे, सचिन वासनिक, ग्रा.पं. सदस्य संगीता देशमुख उपस्थित होते.
संचालन जितेंद्र बावनकुळे तर आभार योगेश आखरे ग्रा. सदस्य बनपुरी यांनी केले. यावेळी मोरेश्वर पाटील, उत्तम मेश्राम, रमेश बावनकुळे, धनराज बावनकुळे, विलास इखार, अंकुश देशमुख, अनिल उके, युवा मोचार्चे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर बनपुरी गावाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत बावनकुळे यांची निवड करण्यात आली तर बेल डोंगरीचे अध्यक्ष म्हणून मंगेश उपासे यांची निवड करण्यात आली.