नागपूर समाचार : काश्मीर मधील पहेलगाम येथे हिंदुस्थानी लोकांवर आतंकवाद्यांनी केलेला निर्मम (भ्याड आणि क्रूर) हिंसाचार हा समस्त मानवतेला काळीमा फासणारा प्रसंग भारतीयांच्या मनावर आघात करून गेला. परंतु विचारपूर्वक आणि नियोजित असा प्रतिकार/प्रतिशोध भारत सरकार आणि भारतीय सैन्याने आतंकवाद्यांच्या विरोधात केला. सरकार आणि सैन्याच्या पराक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी, नमन करण्यासाठी तसेच आतंकवाद्यांचा निषेध करण्यासाठी नागपुरातील समस्त नारी शक्ती एकत्रित येऊन सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली.
आपल्या देशाच्या शूर शहीद सैनिकांसाठी आणि पहलगाममध्ये आपल्या जोडीदारांना गमावलेल्या, त्या प्राण्यांच्या हातून आपल्या कुटुंबातील सदस्यांना मरताना पाहिलेल्या आपल्या बहिणींसाठी, या रॅली ला प्रहार समाज जागृती संस्थेच्या सचिव (रिटायर्ड) फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे आणि रक्षणम् डिफेन्स अकादमी, फेटरीच्या अध्यक्षा मा. राजेश्वरी वानखेडे संबोधित केले.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या रॅलीत प्रार्थनेत श्री दया शंकर तिवारी, प्रगती पाटील, महामंत्री मनीषा काशीकर, अर्चना देहणकर, नंदाताई जिचकार, अश्विनीताई जिचकार, सारिका नांदुरकर, निशा भोयर, निकिता पराये, मीरा कडवे, पद्मा चांदेकर, राजेश्वरी वानखेडे (गेस्ट ), शिवाली देशपांडे (गेस्ट) श्रद्धा पाठक नीता किटकरू,वर्षा चौधरी सरिता माने, संतोष लड्डा, कविता इंगळे, कविता सरदार, रुपल दोडके संध्या चतुर्वेदी सर्व नगरसेविका उपस्थित राहून खरे देशभक्त असल्याचे तसेच त्यांच्यासोबत उभे आहोत आणि स्वतःला एक चांगले आणि खरे देशभक्त असल्याचे सिद्ध करून राष्ट्रगीतांनी या कार्यक्रमाचा समारोप घेण्यात आला.