- Breaking News, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपूर समाचार : मेयो रुग्णालयातील नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अल्प दरात सेवा तसेच उत्तम सुविधा मिळणार : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

मेयो रुग्णालयातील नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अल्प दरात सेवा तसेच उत्तम सुविधा मिळणार

नागपूर समाचार : साऊंड प्रुफ ऑडीयोमेट्री व बरा रुम स्पीच थेरपी सेंटर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मेयो रुग्णालयात अल्प दरात सेवा व सुविधा मिळणार आहेत. याचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. तसेच या रुग्णालयातील नेत्र विभागात नव्याने आलेल्या फॅकोईमल्सीफीकेशन मशीनचा उपयोग नागपूर व ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच होईल, असेही ते म्हणाले.

महाजेनकोच्या कोराडी व खापरखेडा प्लांटच्या वतीने ही यंत्रे भेट देण्यात आली आहेत. त्या यंत्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबरोबरच कान, नाक व घसा विभागात साऊंड प्रुफ ऑडीयोमेट्री व बरा रुम आणि स्पीच थेरपी सेंटरचे उदघाटनही त्यांचे हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी आर. विमला, अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, डॉ. जीवन वेदी, अधीक्षक डॉ. लीना ढांडे, डॉ. मुंदडा, डॉ. संजीव गोल्हर, डॉ. पी.टी. वाकोडे, डॉ. विपीन इखार, डॉ. रितेश शेलकर, सहायक प्राध्यापक डॉ. वैभव चंदनखेडे, डॉ. रवी चंद्रन,ऑडिओलॉजीस्ट मृगा वैद्य, नीलु सोमाणी, महाजेनको कोराडीचे मुख्य अभियंता पि.के खंडारे, खापरखेडा येथील महाजेनकोचे कार्यकारी संचालक राजु घुगे, नितीन वाघ, जी-पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत पंत,चेतन डाफे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

साऊंड ट्रिटेड रुमबाबत डॉ. जीवन वेदी यांनी माहिती देतांना सांगितले की, एखाद्या व्यक्तीचे श्रवणमापण करण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. त्या चाचण्या सुरु असतांना कुठलाही बाहेरचा आवाज आत येऊ नये, याची दक्षता घ्यावी लागते. ऐकण्याची क्षमता मोजण्यासाठी साउंड ट्रिटेड रुममध्ये चाचण्या करण्यासाठी याचा उपयोग होतो.

ऑडिओलॉजी आणि स्वीच थेरपी सेंटर येथे श्रवण मापन केले जाते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात जनतेसाठी या सेवा अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. डॉ. मिलींद किर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 49 शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असल्याचे श्री. वेदी यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.