- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेंतर्गत रस्ते विकासासाठी ४८२.६३ लक्ष रुपये निधी..

खा.तड़स व आ.कुणावार यांचे उपस्थितित भूमिपूजन संपन्न

हिंगणघाट दि.२२ जानेवारी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्पायातील मंजुरीनुसार शहालंगड़ी ते जुनोना,आजंती ते शेगाव (कुंड) तसेच कुंड येथून राज्य महामार्ग क्र .३२२ पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरणाच्या विकासकामाचे भूमिपूजन आज दि.२२ जानेवारी रोजी वर्धा लोकसभा मतदारक्षेत्राचे खासदार रामदास तडस तसेच विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.सदर रस्ता ७.६३ किलोमीटर लांबीचा असून या विकासकामावर सुमारे ४८२.६३ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे,तालुक्यातील हा प्रमुख मार्ग असून या रस्त्याचे मजबुती करणाची जनतेची मागणी होती.

खासदार रामदास तड़स यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

नागपूर बाजार पत्रिका

उपरोक्त कार्यक्रमप्रसंगी भाजपा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पंचायत समिती सदस्य संभाजी देवडे, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, कंत्राटदार शाम भिमनवार, उद्योजक जगदीश मिहानी , आजंती ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सीमाताई देवडे, शेगाव कुंड सरपंच राजु नगराळे, उपसरपंच मधुसूदन हरणे, सातेफळचे सरपंच श्रीराम मेश्राम, सचिव नगराळे, विनोद विटाळे, हरिदास बोरकर, अमोल बोरकर, किशोर वंजारी, अरुण किनाके, संजय चौधरी, ठाणेश्वर, सुनील गुडदे इत्यादी गणमान्य मंडळीसह ग्रामपंचायत सदस्य, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी तसेच गावकरी मंडळी सदर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *