- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : समाजातील विद्यार्थ्यांचा समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार संपन्न

आदिवासी ढिवर समाज संघटना आणि ढिवर समाज महिला संघटनेच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांचा समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार संपन्न

नागपूर समाचार : ढिवर व तत्सम समाजातील विद्यार्थ्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा, लोकप्रतिनिधींचा सत्कार आणि उपवर वधू-वर परिचय मेळावा कार्यक्रमात गुरुदेव सेवा आश्रम शुक्रवारी तलावाजवळ, आग्याराम देवी चौक, नागपूर येथे नुकताच मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी मा.सदशिवराव वलथरे आणि उट्घाटक अँड. नीरज खांदेवाले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अरुण लाटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ढिवर महिला समाज संघटनेच्या अध्यक्षा सौ.वनिता मनोज नगरेंच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. यशस्वीरित्या यावेळी रश्मी नान्हे, रूपा दिघोरे, भारती नान्हे, दुर्गा शिवरकर, सुनंदा उके, रेखा चाचेरकर, शिला नान्हे, महानंदा शिवरकर, विजयाताई करनुके आणि नंदाबाई शिवरकर यांनी खूप परिश्रम घेतलेत.

आदिवासी ढिवर समाजाच्या महिला व सर्व पदाधिकार व आदिवासी महिला संघटनेच्या समाजातील आदिवासी समाजातील ढिवर व तत्सम मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा, लोकप्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच उपवर वधु-वर परिचय मेळावा व सत्कारही करण्यात आला. ढिवर समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमात आदिवासी ढिवर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि उत्तम प्रतिसाद मिळाला व कोरोना महामारीला लक्षात ठेवून आपल्या तोंडावरील मास्क लावाली व सोशल डिस्टिंक्शन चे पालनही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *