- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : झिंगाबाई टाकळी येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ पदग्रहण सोहळा

झिंगाबाई टाकळी येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ पदग्रहण सोहळा

नागपूर समाचार :  झिंगाबाई टाकळी येथील पांडुरंग मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय ओबीसी महिला (पश्चिम नागपूर) पदग्रहण सोहळा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री बबनराव तायवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम नागपूर च्या अध्यक्षा एड सौ स्नेहल बंडुजी ठाकरे यांनी केले त्यात प्रमुख उपस्थिती नागपूर शहराध्यक्षा सौ वृंदाताई विकास ठाकरे होत्या.

प्रमुख अतिथी डॉक्टर सौ शरयू तायवाडे मॅडम सौ कल्पना ताई मानकर मॅडम सौ विजयाताई धोटे सौअनिताताई ठेंगरे सौ नंदाताई देशमुख सौ मीनाक्षीताई गतफने आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री दुर्गादास जिचकार प्रो. श्री मुरलीधर जी वाकोडे श्री विठोबाजी पुसदकर श्री घनश्याम जी मांगे श्री बंडूभाऊ ठाकरे श्री रामभाऊ कळंबे श्री पुरुषोत्तमजी चोरे श्री अशोकराव चीनचे उपस्थित होते. याप्रसंगी पश्चिम नागपूर मधील दाबा परिसरापासून तर झिंगाबाई टाकळी पर्यंत विविध महिलांना पश्चिम नागपूरच्या अध्यक्षा एड सौ स्नेहल बंडूजी ठाकरे यांनी पद वाटप केले.

याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री बबनराव तायवाडे सर यांनी ओबीसी समाज देशात 60 टक्के आहे तरी आपण एकत्रित न आल्यामुळे आपल्यावर कुठे अन्याय होतो हे समजावून सांगितले. तसेच नागपूर शहराध्यक्ष सौ वृंदाताई विकासजी ठाकरे यांनी जास्तीत जास्त महिलांनी एकत्रित येण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाप्रसंगी अंदाजे 450 महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड सौ स्नेहल बंडुजी ठाकरे यांनी केले व आभार प्रदर्शन सौ दर्शना अरविंद ठाकरे यांनी केले व अल्पोहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *