- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : आदिवासी गोवारी स्मारकास महापौर व्दारा पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन

आदिवासी गोवारी स्मारकास महापौर व्दारा पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन

नागपुर समाचार : २३ नोव्हेंबर, १९९४ रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूरात गोवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते.

आज दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता झीरो माईल स्थित गोवारी स्मारकाला महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, आमदार श्री. परिणय फुके, धरमपेठ झोन सभापती श्री. सुनील हिरणवार, नगरसेविका श्रीमती परिणीता फुके यांनी पुष्पचक्र अर्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले. यावेळी गोवारी समाजातील स्त्री – पुरुष व बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *