- Breaking News, विदर्भ

विदर्भ समाचार : आम आदमी पार्टी ने थांबवली विद्यार्थ्यांची लूट

आम आदमी पार्टी ने थांबवली विद्यार्थ्यांची लूट

विदर्भ समाचार : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधिनस्थ महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांनी मान्यता दिलेल्या 23 केंद्रामध्ये 10/20 च्या कोट्यात जनरल नर्सिंग व मिडवायफरी (जीएनएम) प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आरोग्यसेवा आयुक्तालय महाराष्ट्र मार्फत सुरू आहे.

आम आदमी पार्टी चे महानगर सचिव राजु कुडे यांचेकडे तक्रार प्राप्त झाली की या विभागाकडून ॲडमिशन च्या नावाखाली लूट सुरू आहे व दलाल सक्रीय झाले आहे. वरील तक्रारीसंदर्भात आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे व युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यानी संबंधित प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली असता येथील प्राचार्या कडून अधिसुचनेचे पालन करीत नसल्याचे लक्षात आले .व स्वतःच्या मर्जीने नियम धाब्यावर बसवून काम करीत असल्याचे लक्षात आले.

नियम पुस्तिकेत नियम 8 अनुसार ज्यांची निवड झाली त्यांचे कडूनच फक्त मेडिकल फीटनेस सर्टिफिकेट व ईतर कागदपञे घेण्यात यावे हे स्पष्ट लीहीले आहे परंतु फक्त 23 केंद्रा साठी फार्म घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मेडिकल फीटनेस सर्टिफिकेट ची अवाजवी मागणी करणे चुकीचे आहे ही बाब माननीय गहलोत मॅडम उपसंचालक मुंबई यांचे निदर्शनास आम आदमी पार्टीने आणून दिली त्यांनी तात्काळ आदेश देऊन मेडिकल सर्टिफिकेट ची आवश्यकता नसल्याचा आदेश दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांची मेडिकलच्या नावाखाली होत असलेली पाचशे रुपयांची लूट व त्याकरीता मेडीकल ऑफीसर कडे वारंवार माराव्या लागणा-या चकरा आम आदमी पार्टीने तात्काळ थांबवल्या.

एकीकडे कोरोणाचा काळ सुरू आहेत व कामधंदे ठप्प आहे त्यातच पाचशे रुपये फार्मचे व मेडिकलचे पाचशे रुपये त्यानंतर बाहेर गावातील विद्यार्थ्यांना लागलेला तिकीट चा खर्च यामुळे ही बाब विद्यार्थ्यांना झेपेनाशी झाली होती. प्रत्येक विद्याथ्याची पाचशे रुपयाची होणारी लूट थांबविल्याबद्दल सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आम आदमी पार्टीचे आभार मानले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार महानगर सचिव राजू कुडे आप पदाधिकारी महेश गुप्ता जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा सचिव संतोष दोरखंडे निखिल बारसागडे तसेच इतर अनेक आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *