- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपातर्फे झोनस्तरीय कार्यवाही

शुक्रवारी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, लकडगंज झोनमध्ये कार्यवाही

नागपूर समाचार : नागपूर शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपाच्या हॉटमिक्स प्लाँट विभागातर्फे सर्व झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाही अंतर्गत शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, लकडगंज झोनमधील विविध मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले.
शुक्रवारी (ता.८) लक्ष्मीनगर झोनमधील दीक्षाभूमी व अभ्यंकर नगर रोडवरील १६ खड्डे बुजविण्यात आले व १६६.७५ वर्गमीटर रस्त्याचे दुरुस्ती कार्य करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ परिसरातील वंदना फ्लॅट्स व फार्मलँड ते मनपा कन्या शाळा रोडवरील २४ खड्डे बुजवून १५६ वर्गमीटरचे कार्य करण्यात आले.

हनुमाननगर झोन अंतर्गत वंजारी नगर पेट्रोल पंप ते रामेश्वरी, कैलास नगर रोड, क्रीडा चौक ते मेडिकल चौक रोड तसेच बेसा अलंकार नगर ते श्रीकृष्ण नगर रोडवरील एकूण ३६ खड्डे बुजवण्यात आले व ३१२ वर्गमीटरचे दुरुस्ती कार्य करण्यात आले. तर लकडगंज झोन अंतर्गत शास्त्री नगर ते बगडगंज रोडवरील १८ खड्डे बुजवून १८६ वर्ग मीटरचे दुरुस्ती कार्य करण्यात आले.

नागपूर शहरातील झोननिहाय खड्ड्याचे करण्यात आलेले सर्वेक्षण आणि विविध वृत्तपत्र यामधील प्रकाशित खड्ड्यांच्या फोटोनुसार हॉटमिक्स विभागाद्वारे दुरुस्तीबाबत दैनंदिन कार्यवाही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *