- नागपुर समाचार

जातीवाचक वस्त्या व गावाची नावे 15 ऑगस्टपूर्वी बदला : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

जातीवाचक वस्त्या व गावाची नावे 15 ऑगस्टपूर्वी बदला : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर समाचार, दि. 6 :  गावे, वस्त्या तसेव रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत येत्या 15 ऑगस्टपूर्वी कार्यवाही पूर्ण करा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले आहेत. गावे, रस्ते तसेच वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे निर्णयाची अनलबजावणीसाठी विभागीय आयुक्त यांनी आज आढावा, चेतला त्यावेळी त्या बोलत होत्या.

समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड विभागीय उपायुक्त अंकुश जदार, नगर परिषद प्रशासनाचे उपायुक्त गिरीश बनोरे यांच्यासह दूरदृष्ट प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, गडचिरोली दीपक सिंगला, भंडारा संदीप कदम, गोंदिया डॉ. नयना गुडे, वर्षा प्रेरणा देशभ्रतार तर अपर जिल्हाधिकारी शिरीष पडे बैठकीता उपस्थित होते.

श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, जिल्ह्यातील गावे, वस्त्या तसेच रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणाबाबत ग्रामपंचायतने ग्रानसभेत ठराव ठेवून या वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही करण्या संदर्भातील प्रस्ताव पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावा. तसेच कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता कोविड नियमावलींचे पालन करुन ही कर्यवाही करावी.

शसनाच्या अभिलेख्यात नोंदणी झालेली गावे, वस्त्या तसेच रस्त्यांबाबत ही कार्यवाही करावी. परंतु जी गावे, वस्त्या तसेच रस्त्यांची शासन स्तरावर नोंद नाही परंतु त्यांची नावे त्या भागात प्रचलित आहेत अशी नावे निश्चित करुन याबाबत समितीला तातडीने माहिती देण्यात यावी. विभागामध्ये नागपूर आणि चंद्रपूर महापालिका यांनी समितीला याबाबत माहिती अद्याप सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत पाठपुरावा करून माहिती संकलित करावी, असे निर्देश श्रीमती लवंगारे-नर्मा यांनी यावेळी दिलेत.

नगरपालिका तसेच महानगरपालिका क्षेत्रात जातीतचक नावात बदल भरण्याबाबत अद्याप तूचना शासनाकडून प्राप्त नाहीत. त्या प्राप्त करुन घेण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त यानी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना केली. जातीवाचक नावे असलेली गावे, वस्त्यांच्या नावासंबंधी बदलाची माहिती जिल्हाधिकारांनी आढावा घेऊन सादर करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले तसेच यावेळी जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *