- नागपुर समाचार

बसपा प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बसपा प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी :  बहुजन समाज पार्टी च्या वतीने कामठी विधानसभा क्षेत्रांमध्ये आकांक्षा स्टडी सर्कल या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला राज्याचे अध्यक्ष.एड.संदीप ताजणे यांनी भेट दिली. शिबिराला मार्गदर्शन करतांना संदीप ताजने म्हणाले बहुजन समाज पार्टी शिस्तबद्ध व व्यवस्था परिवर्तनासाठी १९८४ पासून प्रयत्नशील आहे. परंतु हल्लीच्या काळात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी कोरोणा महामारी च्या नावावर गरीब, असहाय्य, असंघटित कामगार बहुजन समाजाचे फार मोठे नुकसान केले. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बहुजन समाजातील असंघटित कामगारांवर उपासमारीची चे दिवस आले. एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराला बहुजन समाज पार्टीचे राज्याचे मा. रवींद्र गवई यांनी मार्गदर्शन केले.

बसपा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्याचे महासचिव नागोराव जयकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिराला नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम, नितीन सिंगाडे, बाबुल डे, विजय कुमार डहाट, महेंद्र रामटेके, मोहम्मद शफी ,नागपूर जिल्हा महिला विंगच्या सचिव मायाताई उके, नागपूर जिल्हा महिला विनच्या संघटन सचिव साधनाताई काटकर, कामठी विधानसभा क्षेत्राचे इन्चार्ज चंद्रशेखर पाटील ,प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिराचे संचालन कामठी विधानसभेचे अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम यांनी केले. शिबिराचे प्रास्ताविक किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केले तर कामठी शहर महिला विंगचे अध्यक्षा सुनिता रंगारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

शिबिराला यशस्वी करण्यासाठी कामठी विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी, आत्माराम चंद्रशेखर, रामभाऊ कुर्वे, दिलीप नागदेवे, कामठी शहर बसपा अध्यक्ष विनय उके, छावणी परिषदेचे अध्यक्ष नितीन सहारे, निशिकांत टेंभेकर, विशाल गजभिये, अमित भैसारे, दिपालीताई गजभिये, परमानंद बनसोड, प्रतिभाताई नागदेवे, ताराचंद फखिडे , मंजू ताई डहाट, आम्रपाली सोणारे, प्रिती ताई गजघाटे, वर्षाताई भालेराव, उत्तम मेश्राम, मनोज मेश्राम, जीवन बावणे ,गोलू मेश्राम, यांनी अतिशय परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *