- नागपुर समाचार, मनपा

शनिवारी नागपूर शहरात ६४९७ घरांचे सर्वेक्षण

नागपूर, ता. ३१ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. या अंतर्गत घरांघरांमध्ये जाउन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जाते व डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
            शनिवारी (ता.३१) प्राप्त झोननिहाय अहवालानुसार शहरात ६४९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात २८२ घरे ही दुषित आढळली. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये ९० ताप असलेले रुग्ण आढळून आले. तर १२३ जणांच्या रक्ताचे नमूने तर २० जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान १९५९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २०३ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे १६३ कुलर्स रिकामी करण्यात आले. ७३४  कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन  तर ९१५ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच १८९ कुलर्समध्ये गप्पी मासे  टाकण्यात आले.
            शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत: याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी डासांपासून संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी. सोबतच डासोत्पत्ती होणार नाही याचीही प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील कुंड्या, कुलरची टाकी, भांडी व जिथे पाणी साचू शकते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय ताप, उलट्या, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ ही व अशी अन्य डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *