- मनपा

वाचनालयातील विद्यार्थाना मिळणार सुविधा*

 

*आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*

नागपूर, ८ जुलै :
उत्तर नागपुरातील बाजीराव साखरे वाचनालय, डॉ राममनोहर लोहिया वाचनालय, पंचशील वाचनालय, सिद्दार्थ वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश वाचनालय येथील स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थाना मागणीनुसार पुस्तके आणी इतर सोयी तात्काळ पुरविण्याचे आदेश आज मनपा आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्हाचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मनपा आयुक्त बी.राधाकृष्णन उपस्थित होते.

वाचनालयात विद्यार्थांना अभ्यास करतांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. वाचनालयात पिण्याचे पाणी नाही, असामाजिक तत्वांचा वावर असतो, नादुरुस्त इलेक्ट्रिक फिटिंग, पार्किंगच्या जागी शेडची निर्मिती, टाईल्स फिटिंग, इमारतीमधून पाणी गळती, अस्वछ शौचालय, परिसरातील सौंदर्यीकरण, विद्यार्थांना वर्तमान पत्रांसह मासिके तात्काळ नि:शुल्क उपलब्ध करुन द्यावे असेही सांगितले. यावेळेस तानाजी वनवे विरोधी पक्ष नेता मनपा, श्रीमती लिना उपाध्ये अधीक्षक अभियंता, श्रीमती प्रिती मिश्रीकोटकर, शिक्षणाधिकारी मनपा, श्रीमती अल्का गांवडे, ग्रंथालय अधीक्षक मनपा व इतर अधिकारी उपस्थित होते.

लष्करीबाग येथील बाजिराव साखरे वाचनालयात विद्यार्थाना सुविधा पुरविण्यासह लहान मुलांकरिता आणि वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र अध्ययन कक्षाची निर्मिती करण्यासंबधी आदेश दिले. यावेळेस डाँ.नितीन राऊत यांनी डिजीटल सादरीकरण देखील बघितले.

*लोहिया वाचनालयाचा पुर्नविकास*

अशोक नगर स्थित डाँ. राममनोहर लोहिया वाचनालय व श्रीमती उषाराणी महिला वाचनालयामध्ये विद्यार्थांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन या वाचनालयाचा पुनर्विकास करण्यासंबधी संपूर्ण आराखडा तयार करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
लोहिया वाचनालय नागरिकांच्या भावनेशी जुळलेले आहे. या वाचनालयानी अनेक अधिकारी देशाला दिले आहेत. मी सुद्धा या वाचनालयात अभ्यास करायचो, असे डाँ.राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *