नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हे नागपूर सुधार प्रन्यासचे पदसिध्द विश्वस्त असतात. त्यानुसार म.न.पा.स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रकाश भोयर यांनी सोमवार (ता.५ एप्रिल) रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त पदाचा पदभार स्वीकारला.
एका छोटेखानी समारंभात सुधार प्रन्यास मध्ये श्री. भोयर यांचे उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. विकास कुंभारे, स्थापत्य समिती सभापती श्री. राजेन्द्र सोनकुसरे, धंतोली झोनच्या सभापती सुश्री वंदना भगत, माजी सभापती श्रीमती विशाखा बांते, अग्निशमन समिती उपसभापती श्री.किशोर वानखेडे यांनी स्वागत करुन अभिनंदन केले. श्री. भोयर यांनी विश्वास व्यक्त केला की नागपूर मनपा आणि सुधार प्रन्यास मध्ये समन्वय ठेवून राहिलेली विकास कार्य पूर्ण केले जातील.