- Breaking News, नागपुर समाचार

गृहमंत्र्यांचा पुतळा जाळून केला निषेध; भाजयुमोचे आंदोलन

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा आज त्यांच्याच घरासमोर जाळून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली. राजीनामा दिला नाही तर अधिक ऊग्र व तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांनी केले. आंदोलनाला मार्गदर्शन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे केले. अनेक कार्र्यकर्ते दुपारी अचानक सिव्हिल लाईन्समधील अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोहोचले व त्यांनी घोषणा देणे सुरू केले. काहीवेळ घोषणा दिल्यानंतर कार्यकत्र्यांनी गृहमंत्र्यांचा पुतळा जाळला. या आंदोलनाची पोलिसांना कुणकुण लागताच पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची झटापट झाली. पोलिसांनी अनेक कार्यकत्र्यांना ताब्यात घेतले. काहीवेळ स्थानबद्ध केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
 
 
भाजयुमोचे सर्व मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, यश सातपुते, अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, पंकज सोनकर, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश रहाटे प्रमुख्याने उपस्थित होते. दीपांशु लिंगायत, सचिन सावरकर, सचिन करारे, प्रसाद मुजुमदार, अमित बराई, नितीन शिमले, रिद्धु चोले, केतन साठवणे, संकेत कुकडे, करन यादव, आशुतोश भगत, मनमित पिल्लारे, नागेश साठवणे, अंकित दास, अक्षय दाणी, आशीष मेहर, पिंटु पटेल, मंगेश धार्मिक, गोविंदा काटेकर, निलेश लारेकर, अक्षय ठवकर, सन्नी झेंडे, रितेश पांडे, अनुप साळवे, शुभम समुद्रे, सागर गंधर्व, पुष्कर पोरशेट्टीवार, सागर घाटोले, योगेश मोवाडे, अक्षय शर्मा, रोहित त्रिवेदी, सौरभ पराशर, आशीष मिश्रा, कमलजित सिंग, रुपेश ठाकरे, अंकित वाल्मिकी आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *