

लोकमाता श्रीमती सुमतीताई सुकळीकर स्मृती जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर समाचार : लहान मुलांना सुसंस्कृत करून देशाचा उत्तम नागरिक घडवण्याची ताकद बालजगतच्या प्रकल्पांमध्ये आहे. याच प्रकल्पांमधून नवीन पिढी घडेल. यासाठी प्रत्येक पालकांनी या विविध प्रकल्पामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ रविंद्र कुमार सिंगल, (आयपीएस) यांनी केले.
दीनदयाल शोध संस्थान बालजगत लक्ष्मीनगर नागपूर च्या वतीने उन्हाळी शिबिरातील जलतरण प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची जलतरण स्पर्धा घेण्यात आले. रविवारी झालेल्या या स्पर्धेला बालक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या समारोपीय सत्रात डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते विजेत्या चमूना पारितोषिके वितरीत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बालजगतच्या मोठ्या जलतरण टॅंकवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण चार गट सहभागी झाले. त्यात साहस गट(मृणाल चतुर आणि पियुष घुई)वीर गट( सिद्धेश निवाड प्रीती गावकर),पराक्रम गट( निखिल बांडे, पर्णी सोनटक्के) आणि शौर्य गट (तारिका दांडेकर, चेतन बावनकर) यांच्या नेतृत्वात 275 प्रशिक्षणार्थीचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शिका निवृत्त न्या. व सामाजिक कार्यकर्ती मीरा खडक्कार यांच्या हस्ते प.पू. दीनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि वयोगट 5 ते 8 मुलांच्या स्पर्धेला झेंडा दाखवून झाली. यावेळी बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे, पंकज महाजन, अनुजा परचुरे, सचिव संजय भाकरे, अजय सालोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी साहस टीमला फिरता चषक देण्यात आला. यावेळी प्रत्येक ग्रुप मधील 3 विजेत्यांना गोल्ड,सिल्व्हर , ब्राँझ मेडल, गिफ्ट आणि सर्टिफिकेट देण्यात आले.
खालील प्रमाणे विजेत्यांचे नावे
श्रेया देशमुख, गार्गी हरडे, रुही गुप्ता, विप्लाव गावंडे, अद्वैत लिमये, ओंकार मराठे, पहल मेश्राम, माही चव्हाण, स्वरा बावनकुळे, स्वस्तिक जैस्वाल, शॉन सूर्यवंशी, अर्जुन कुमावत, स्वरा चेपे, वरालिका गांजापुरे, स्वरा नेमाड ,वेद चक्रपाणी, अर्णव कानडे, सिद्धाव फडणवीस, पार्थ देशमुख, अर्जुन महाशब्द, यश जीवतोड, माधवी आंबिलडोके, सचिन चौधरी, गुलशन त्रिवेदी, पहल मेश्राम, तन्वी आंबीलडोके, रेव बावनकुळे, पार्थ देशमुख, अर्जुन महाशब्दे गार्गी तालातुले गुलशन त्रिवेदी, सचिन चौधरी, सम्राट जोग आणि सार्थक भुरे यांना पदके प्रदान करण्यात आले.





