- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : १४३ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (०९ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १४३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २३१९७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ९९,५७,५००/- चा दंड वसूल केला आहे.

बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १३, धरमपेठ झोन अंतर्गत २३, हनुमाननगर झोन अंतर्गत २६ धंतोली झोन अंतर्गत ७, नेहरुनगर झोन अंतर्गत २२, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ९, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोन अंतर्गत १२, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील 3 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १७७२७ बेजबाबदार नागरिकांकडून रु ८८ लक्ष ६३ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *