- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिराचे अनावरण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते संपन्न

नागपूर समाचार : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिराचे अनावरण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समाजाला समता, मानवता, बंधुभाव व सामाजिक ऐक्याचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे हे मंदिर समाजासाठी प्रेरणा, श्रद्धा व संस्कारांचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणयजी फुके, माजी आमदार श्री. सुधाकर कोहळे, श्री श्री १०८ संत सतपालदास जी महाराज, नगरसेवक श्री. योगेशजी पाचपोर, नगरसेवक श्री. विजय होले, श्री. संजय सरायकर, श्री. अनंतजी जगनीत, श्री. हरिश्चंद्र तांडे, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत रविदास महाराजांच्या पवित्र विचारांनी समाजात सदैव समता, सद्भावना व मानवतेची ज्योत प्रज्वलित राहो, हीच प्रार्थना.