वर्धा समाचार : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि वर्धेचे माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे २२ मार्च २०२६ रोजी नागपूर येथे वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.चार वेळा खासदार आणि राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तसेच एक दिलदार व दमदार मित्र गमावला अशी भावना पंडीत शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.
दत्ताजी मेघे व पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांचे खूप जुने ऋणानुबंध असून अत्यंत जिव्हाळ्याचे पारिवारिक संबंध होते. नुकत्याच झालेल्या पाडवा पहाट या कार्यक्रमात त्यांची व पंडितजींची भेट झाली या भेटी दरम्यान त्यांनी रामनवमी निमित्य आयोजित कार्यक्रमात मी तुमच्याकडे येईल असे सांगितले होते परंतु नियतीला हे कदाचीत मान्य नसावे,त्यांना काळाने हिरावून नेले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच प्रार्थना.



