- Breaking News, नागपुर समाचार, प्रदर्शन

नागपूर समाचार : भारताची जागतिक प्रतिमा मलीन करणाऱ्या काँग्रेसचा व राहुल गांधींचा नागपूर भाजयुमोतर्फे तीव्र निषेध

नागपूर समाचार : नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गैरवर्तनाचा आणि अर्धनग्न प्रदर्शनाचा नागपुरात तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) नागपूर महानगरच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वाजता महाल येथील टिळक पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले.भाजयुमोचे नागपूर महानगर अध्यक्ष सचीन करारे यांनी काँग्रेसवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, “जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट’च्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात आपले जागतिक नेतृत्व सिद्ध करत आहे, तेव्हा युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न प्रदर्शन करून देशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासण्याचे दुर्दैवी कृत्य केले आहे.

काँग्रेसच्या या प्रदर्शनामुळे त्यांचा नग्नपणा उघड झाला आहे. माहात्मा गांधींनी देशातील गरिबी पाहून अर्धनग्न आयुष्य जगले, परंतु राहुल यांची काँग्रेस देशाचे वैभव पाहून उघडी पडत आहे. हा काँग्रेसचा वैचारिक दिवाळखोरपणा आहे.१०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि २० हून अधिक राष्ट्रप्रमुख उपस्थित असलेल्या या प्रतिष्ठित कार्यक्रमात अशा प्रकारचा ‘धिंगाणा’ घालणे, हे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्याचे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे.

“या परिषदेची थीम ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ अशी असताना आणि भारत शेती, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात AI च्या माध्यमातून क्रांती घडवत असताना, काँग्रेसने अशा प्रकारे अडथळे आणणे अत्यंत संतापजनक असल्याचे आंदोलकांनी म्हटले. या प्रकारामुळे जगभरात भारताच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, याला जबाबदार असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजयुमोने केली आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या या ‘अर्धनग्न धिंगाण्याचा चा’ निषेध करण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा अर्धनग्न पोस्टर झळकवत टिळक पुतळा येथे जोरदार घोषणाबाजी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नाचक्की करणाऱ्या बेजबाबदार कार्यकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात महामंत्री रितेश मनोजकुमार पांडेय, महामंत्री ऋषभ अर्खेल, संपर्क प्रमुख नागेश साठवने, निलेश रारोकर, अथर्व त्रिवेदी, जय साजवानी, गोविंदा काटेकर, हर्षल मलमकर, एजाज़ शेख, प्रवीण श्रीवास, उदय मिश्रा, अक्षय शर्मा, ईशान जैन, सन्नी झेंडे, प्रज्वल मंगर, सुयश झनझनवार , साहिल ठाकुर, तुषार ठाकरे, आशीष तिवारी, राहुल ताक़वत, अनुज तिवारी, प्रयाग पांडे, निलेश हेड़ाऊ, अनूप समुन्दरे, दिनेश आर्मोरिकर, शुभम मुंडले, सार्थक दारुणकर व भाजयुमोचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.