- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार भजन स्पर्धेची दक्षिण नागपूरची प्राथमिक फेरी ७ फेब्रुवारीला

वारकरी भूषण आदरणीय श्री अनिल महाराज अहिर करणार उद्घाटन आणि आमदार मोहन भाऊ मते यांची विशेष उपस्थिती

दक्षिण नागपुरातील २०७ भजनी मंडळ करणार विठ्ठल भक्तीचा जागर

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेच्या दक्षिण नागपूरच्या प्राथमिक फेरीचे आयोजन ७ फेब्रुवारी रोजी श्री अयोध्या नगर साई मंदिर, आणि श्री हनुमान मंदिर वैभव नगर दिघोरी या दोन ठिकाणी करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता उद्घाटन ह भ प वारकरी भूषण आदरणीय श्री अनिल महाराज अहिर यांचे हस्ते होईल, प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण नागपूर चे आमदार मोहनजी मते, सौ सविताताई मते, श्री देवेंद्रजी दस्तूरे, भोजराज डुंबे, विष्णूजी चांगदे, विश्व हिंदू परिषदेच्या कल्पना गढवे, दक्षिण नागपूरचे नगरसेवक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहतील. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष यंदाच्या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे.

दक्षिण नागपुरातील २०७ भजनी मंडळ विठ्ठल भक्तीचा भक्तीचा जागर करणार आहेत.      

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार दि २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ५ मध्ये शिक्षक सहकारी बँक सभागृह गांधी सागर महाल येथे आयोजित असून निवडीत २१ भजनी मंडळांना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या उपस्थित राहून भजनी मंडळांचा उत्साह वाढवावा असे आवाहन खासदार भजन स्पर्धेचे संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे.