नागपूर समाचार : सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या बॅडमिंटन संघाने जिल्हा व विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे. संघाने विभागीय स्पर्धेत दमदार खेळ सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि क्रीडाभाव दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. खेळाडूंमध्ये कु. निशिका हेमंत गोखे, आरती राजेंद्र सानसरोदे, आरुषी विनोद पांडे, मृण्मयी सत्येंद्र जोशी यांनी उल्लेखनीय खेळ करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विभागीय अंतिम सामन्यात सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाने मॉर्डन स्कूल नागपूर यांचा 2.0, 2.0 असा पराभव करून राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमती कांचन गडकरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “ही आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी यशाची परंपरा कायम ठेवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल संस्थेच्या सचिव मा. श्रीमती वासंती भागवत, उपाध्यक्ष मा.बापूसाहेब भागवत, उपाध्यक्ष डॉ. समयजी बनसोड, पालक संचालक श्री.अमर कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री अजय चव्हाण, पर्यवेक्षक श्री संदीप झाडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.




