- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा, पांढरी काठी दिनानिमित्त रमा पाटील यांचे प्रतिपादन

नागपुर समाचार : जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त दिव्यांग बंधू भगिनींना किराणा किट वाटप व पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पहला. सुजाण बहुउद्देशिय विकास मंच व प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिज्युअल चॅलेंजच्या संयुक्त विद्यमानात नुकतेच अर्पण सभागृह, हिंदी मोर भवन, सीताबर्डी येथे दिव्यांग बंधू भगिनींना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या रमा पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दिव्यांगांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. मंचावरून संबोधित करतांना त्यांनी म्हटले की मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा होय. तसेच सदैव मी आपणासोबत राहील.

प्रमुख अतिथी म्हणून आनंद सिंग, पी.एम. डहाके, त्र्यंबक मोकासरे, मिनाक्षी बाराहाते आदी उपस्थित हाते. यांच्या हस्ते एकुण ४५ लाभार्थी दिव्यांगांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कांबले यांनी केले. संचालन राजेश हाडके यांनी मानले.

याप्रसंगी दृष्टीबाधीत कवि नरेंद्र ताकसांडे यांना दिव्यांग साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर रेखा जिवतोडे यांना सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आभार प्रोग्रेसिव्ह फेडरेशनच्या उपाध्यक्षा सुनंदा पुरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता शालू कांबले, सुनंदा मोकासरे, गायत्री आवळे, सुरेंद्र आवळे आदींनी सहकार्य केले.