नागपूर समाचार : भारतासाठी पूर्वोत्तरमधील आठही राज्ये महत्त्वपूर्ण असून त्यांची भाषा, संस्कृती निराळी असली, ‘भाषा अनेक फिर भी हमारा देश एक’ या न्यायाने एकतेचा संदेश पूर्वोत्तरवासीयांनी दिला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिनजी गडकरी यांनी आज नागपूर येथे केले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय ‘नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह’ महोत्सवाचा आज समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते.




