- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : हिंदु एकता प्रतिष्ठान तर्फे “रायगड मोहिम 2025′ हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन

प्रस्थान स्थळः माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, रेशीमबाग मैदान, नागपूर

नागपूर समाचार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने तेजोमय रायगड किल्ल्याकडे हिंदु एकता प्रतिष्ठान तर्फे “रायगड मोहिम 2025′ हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत नागपूर शहरातून तब्बल 18 बस, 150 ते 200 कार आणि सुमारे 1500 युवकांचा विशाल ताफा रायगडाच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या मोहिमेचा उद्देश आजच्या युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, विचार आणि त्यागाशी जोडणे, तसेच हिंदू धर्माविषयी जागरूकता आणि हिंदूंचे एकत्रीकरण घडवणे हा आहे.

आजची युवा पिढी विविध व्यसनं, चुकीच्या प्रवृत्ती आणि दिशाहीनतेक कत आहे. अशा काळात त्यांना धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या मार्गावर आणण्याचा हा प्रयल आहे. या मोहिमेतील एक विशेष आकर्षण म्हणजे- नागपूरच्या छोट्या मुलांचा ढोल-ताशा पथक रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर वादन करणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या भूमीत या लहान कलाकारांकडून होणारा हा सम्माननीय कार्यक्रम, युवकांमध्ये अभिमान आणि प्रेरणेची जाज्वल्य ज्योत प्रज्वलित करेल.

या मोहिमेचे मार्गदर्शक आमदार मोहनजी मते (दक्षिण नागपूर) असून, हिंदु एकता प्रतिष्ठान ने या मोहिमेचे आयोजन केले आहे. हिंदू एकता प्रतिष्ठान सर्व नागपूरकर आणि युवकांना या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा संदेश समाजात पोहोचवण्याचं आवाहन करते.

“रायगड मोहिम 2025” ही युवकांच्या सहभागातून उभी राहणारी हिंदू ऐक्य, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याप्रेरणेची जाज्वल्प चळवळ ठरणार आहे.